कारंजा - मानोऱ्यातील १०६ पाणंद रस्ते घेणार मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:31 AM2021-02-19T04:31:45+5:302021-02-19T04:31:45+5:30

जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे आणि विविध कामांसाठी साहित्य घेऊन ...

Karanja - 106 Panand roads in Manora will breathe freely | कारंजा - मानोऱ्यातील १०६ पाणंद रस्ते घेणार मोकळा श्वास

कारंजा - मानोऱ्यातील १०६ पाणंद रस्ते घेणार मोकळा श्वास

Next

जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे आणि विविध कामांसाठी साहित्य घेऊन जाण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांवर दलदलसदृश स्थिती निर्माण होत असल्याने शेतीची वाटच बंद होते आणि कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कारंजा - मानोरा तालुक्यातील पाणंद रस्त्यांची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विकास निधीतून १०६ रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ही कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

--------

प्रशासकीय मंजुरीसाठी तहसीलदारांकडे अंदाजपत्रके

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत पाकलमंत्र्यांनी कारंजा - मानोरा तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांना २६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मान्यता दिली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता दिलेल्या रस्त्यांच्या कामाची अंदाज पत्रके तयार करून ती तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

--------

कारंजा - मानोरा मतदारसंघात

पाणंद रस्त्यांची संख्या

तालुका रस्ते

कारंजा ४७

मानोरा ५९

---------------

एकूण १०६

Web Title: Karanja - 106 Panand roads in Manora will breathe freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.