कारंजा शहर हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:05 AM2017-07-19T01:05:31+5:302017-07-19T01:05:31+5:30

केंद्रीय पथकाचा अहवाल : पालिकेच्यावतीने आनंदोत्सव

Karanja city is free! | कारंजा शहर हगणदरीमुक्त!

कारंजा शहर हगणदरीमुक्त!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गठीत केंद्रीय पथकाने तपासणी करून कारंजा शहर हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल १८ जुलै रोजी शासनाकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे शासकीय निकषानुसार अमरावती विभागात उत्तीर्ण होणारी नगर परिषद म्हणून कारंजाला मान मिळाला असून, याप्रती नगर परिषदेच्यावतीने आज मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
१५ जुलै रोजी शासनाच्या केंद्रीय पथकाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कारंजा शहरातील मु.जे.हायस्कूल, आर.जे.हायस्कूल, रंगारीपुरा, भारतीपुरा, सारंग तलाव, शीतला माता परिसर, शिवाजी हायस्कूल पुतळा आदी परिसराची जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी करून तसा अहवाल शासनाकडे सादर केला. १८ जुलै रोजी शासनाच्या निकषानुसार कारंजा नगर परिषद सर्वांगाने उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद उत्तमराव वानखडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्रीय नियंत्रण कक्ष, दिल्ली येथून कारंजा नगर परिषद उत्तीर्ण झाल्याची घोषणा प्राप्त होताच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी फटाके व ढोलताशाच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुख्याधिकारी वानखडे यांचा आरोग्य सभापती जावेदद्दोनी इस्मामोद्दीन व न.प.कर्मचाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम.टी.खान, आरोग्य सभापती इस्लामोद्दीन यांच्यासह सर्व सदस्यांनी स्वच्छ भारत अभियानास वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. संदेश मोरे, स्वच्छ भारत अभियान कक्ष प्रमुख दरेकर, सी.आर.दंडवते, अभियंता बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमेश सरगर, प्रफुल आग्रेकर, बाळकृष्ण देशमुख, सहा. कार्यालय पर्यवेक्षक वसंत पाटील, कर निरीक्षक राजू खंडारे, निशिकांत परळीकर, सहा. मिळकत व्यवस्थापक प्यारेचंद आदिवाल, गुलशन गेडाम, अग्निशमन अधिकारी माधवी भिलावेकर, संगणक अभियंता इलियास अहेमद, रोखपाल, प्रवीण मोहेकर, बांधकाम अभियंता विशाल सैवर, विद्युत अभियंता विशाल वाघ, विधी व कामगार पर्यवेक्षक धम्मपाल पंडित, साखरकर , मुकुंद लोखंडे व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी पुढाकार घेतला.

Web Title: Karanja city is free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.