कारंजा लाड : राहत्या जागेचा नमुना ‘ड’ द्या : माहुरवेस परिसरातील नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:26 PM2018-01-15T22:26:52+5:302018-01-15T22:30:09+5:30
वाशिम: सरकारी जागेवरील राहत्या घराची नोंद होवून जागेचा ‘नमुना ड’ देण्याची मागणी शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे १५ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सरकारी जागेवरील राहत्या घराची नोंद होवून जागेचा ‘नमुना ड’ देण्याची मागणी शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिका-यांकडे १५ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे.
लहुशक्ती सेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की वाशिममधील जुन्या हिंगोली नाक्याजवळ असलेल्या माहुरवेश रावणदहन मैदानात जवळपास ४० ते ५० वर्षांपासून बेघर लोक सरकारी जमिनीवर कच्ची घरे बांधून राहत आहेत. ते नगर परिषदेकडून आकारला जाणारा कर दरवर्षी न चुकता अदा करतात. सदर जागेची असेसमेंट नक्कल सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, परंतू नझुल कार्यालयात या घरांची नोंद अद्याप झालेली नाही. पंतप्रधान घरकुल योजना व रमाई आंबेडकर घरकुल योजनेकरीता राहत्या जागेवर घरकुल बांधून मिळण्यासाठी नमुना ड ची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे राहत्या घराचा त्वरीत सर्वे होवून संबंधित कार्यालयात आमच्या घराची नोंद होवून ‘ड नमुना’ मिळण्यात यावा. याशिवाय वाशिम जिल्हयात संपूर्ण ग्रामीण भागात व शहरातील काही भागात सुध्दा वरील परिस्थितीचा सर्वे करुन संबंधित कार्यालयात तशी नोंद होवून ड नमुना मिळावा, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिका-यांना निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कांबळे, उपाध्यक्ष मोहनराज दुतोंडे, अनिल रणबावळे, सुनील दळवे, दिपक साठे, सुमन गायकवाड, शोभना सावळे आदी उपस्थित होते.