कारंजा लाड: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक घेताहेत ‘स्पोकन इंग्लिश’चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:24 PM2017-12-29T13:24:59+5:302017-12-29T13:25:34+5:30
कारंजा लाड: पंचायत समिती व शिक्षण विभाग कारंजा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ८ मधील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळा काळी कारंजा येथे १२ डिसेंबर पासून सुरू आहे.
कारंजा लाड: पंचायत समिती व शिक्षण विभाग कारंजा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ८ मधील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळा काळी कारंजा येथे १२ डिसेंबर पासून सुरू आहे. या प्रशिक्षण वगार्चा समारोप ३० डिसेंबर रोजी होणार आहे.
स्पोकन इंग्लिश विषयाचा प्रशिक्षण कार्यक्रम टप्याटप्याने सुरू आहे. प्रशिक्षण वर्गात १ ते ८ मधील मराठी, उर्दु माध्यमाच्या शाळेतील इंग्रजी विषयात आवड असणाºया एका शिक्षकाचे तालुका स्तरीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या प्रशिक्षणात १५० शिक्षकाचा समावेश आहे. गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या मार्गदर्शनाखाली १२ डिसेंबर पासून सुरू असलेल्या प्रशिक्षणाचे समन्व्यक महेंद्र उघडे व नितीन केळतकर तर सुलभक म्हणून मित्रचद वाटकर, अरुण राठोड, अरुण ठाकरे हे प्रशिक्षण देत आहे.