कारंजा तालुका ठरतोय ‘हॉटस्पॉट’(टिप- बातमीत शब्द बोल्ड केले आहेेत. कृपया पाहणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:09+5:302021-02-23T05:02:09+5:30
वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आता ८ हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यात जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७,७७३ लोकांना कोरोना संसर्ग ...
वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आता ८ हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यात जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७,७७३ लोकांना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी ७,११४ रुग्ण बरे होऊ न घरी परतले, तर १५६ जणांचा मृत्यू झाला असून, ५०२ रुग्णांना उपचाराखाली घेण्यात आले. त्यातही गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ४५८ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले, तर जिल्ह्याबाहेर गेलेले २४ लोकही कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. अर्थात, आठवडाभरात जिल्ह्यातील ४८२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण कारंजा तालुक्यात सर्वाधिक असून, गेल्या आठवडाभरातच या तालुक्यात १४१ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यात १४१, तर त्या खालोखाल रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा या तालुक्यांचा क्रम येतो. कारंजा तालुक्यास परजिल्ह्याच्या तीन सीमा लागतात. त्यात अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. त्यातही अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लाटच पसरली असून, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक कारंजामार्गेच वाशिम जिल्ह्यात दाखल होतात. नागरिकांच्या या प्रवासातूनच वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळत असल्याचे कारंजातील बाधितांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
-----------
असिम्प्टोमॅटिक करिअर शोधण्याचे आव्हान
कारंजा तालुक्यास अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या तीन सीमा लागतात. या तिन्ही जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. त्यातही अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लाटच पसरली असून, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक कारंजामार्गेच वाशिम जिल्ह्यात दाखल होतात. नागरिकांच्या या प्रवासातूनच वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळत असल्याचे कारंजातील बाधितांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणारे असिम्प्टोमॅटिक करिअर शोधण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.
---------------
पाच चेकपोस्टवर नागरिकांची तपासणी
कारंजा तालुक्यास लागून असलेल्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांतून कोरोनाबाधित नागरिक कारंजात दाखल होऊन कोरोना संसर्ग वाढीस मदत होऊ नये, म्हणून या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कारंजा तालुक्यातील पाच गावांत तहसीलदारांच्या आदेशानुसार चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. ढंगारखेड, दोनद बु, मेहा, खेर्डा आणि सोमठाणा येथे या चेकपोस्ट असून, या चेकपोस्टवर दोन पोलीस वाहने थांबवून, दोन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करीत आहेत.
---------------
कोट: कारंजा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोना चाचणी वेगात सुरू असून, जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाच ठिकाणी चेकपोस्टही सुरू करण्यात आल्या आहेत, शिवाय शहरांत आणि गावांत फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
-धिरज मांजरे,
तहसीलदार, कारंजा
आठवड्यातील रुग्णसंख्या
तालुका रुग्ण
कारंजा १४१
वाशिम १२१
रिसोड ८४
मंगरुळपीर ८३
मालेगाव २०
मानोरा ०९