शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजाच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:48 PM2018-09-02T13:48:36+5:302018-09-02T13:49:10+5:30

कारंजा लाड (वाशिम) : विविध शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजा येथील जे.सी. विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीयस्तरावर धडक दिली. या कामगिरीबद्दल शनिवारी विद्यालयाच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

karanza's team's outstanding performance in the school sports competition | शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजाच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी

शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजाच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : विविध शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजा येथील जे.सी. विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीयस्तरावर धडक दिली. या कामगिरीबद्दल शनिवारी विद्यालयाच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
सन २०१८ -१९ या वर्षीच्या शालेय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलींचा डॉजबॉलचा संघ जिल्हास्तरावर विजयी झाला असून, विभागस्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरला आहे. या संघात अक्षया सुडके, प्रिया सुडके, सुप्रिया सुडके, संज्योत चिपडे ,हिंदवी काळे, काव्या किन्हीकर, ईशा वानखडे, श्रेया निंघोट, मनस्वी कडू यांचा समावेश होता.
१९ वर्षाआतील मुलींचा टेबल टेनिसचा संघदेखील विभागीय स्तराकरिता   पात्र झाला आहे. या संघात माही सागाणी, कनिष्का राय, यशस्वी शेजव, गायत्री गोरले, रुचीता शर्मा यांचा समावेश होता. १४ वर्षाआतील मुलींच्या जलतरण स्पर्धेतदेखील ५० मीटर फ्रि स्टाईलमध्ये पहिला क्रमांक मिळविला. याच क्रिडा प्रकारातील १७ वर्षाआतील मुलांच्या संघानेही विजय नोंदवत यश मिळविले. स्पंदन काहाळे, कुणाल गुगळे व हर्षवर्धन मुकुंद यांनीही प्रथम क्रमांक  पटकविला.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे विद्यालय व कारंजा एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने सचिव शिरिष चवरे, मुख्याध्यापक उदय नांदगावक, आर.जे.चवरे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चोपडे, पर्यवेक्षक भारत हरसुले यांनी सत्कार केला.

Web Title: karanza's team's outstanding performance in the school sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.