काेराेना : सात दिवसांत हजाराचा आकडा आला शेकडाेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:44+5:302021-06-09T04:50:44+5:30
वाशिम : गत महिन्यात कहर माजविणारा काेराेना संसर्ग जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमी व्हायला लागल्याचे आराेग्य विभागातील आकडेवारीवरून दिसून ...
वाशिम : गत महिन्यात कहर माजविणारा काेराेना संसर्ग जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमी व्हायला लागल्याचे आराेग्य विभागातील आकडेवारीवरून दिसून येते. मे महिन्याच्या २५ ते ३१ या सात दिवसांत १,५८१ रुग्ण आढळून आले हाेते. तेच जून महिन्याच्या ७ तारखेपर्यंत केवळ ६०९ रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीचा विचार केला असता हजारात असलेला रुग्णसंख्येचा आकडा शेकड्यावर आला आहे. ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.
जिल्ह्यात मे महिन्यातील शेवटच्या सात दिवसांमध्ये एकूण १,५८१ जण काेराेना पाॅझिटिव्ह आले हाेते तर १,२८५ जणांनी काेराेनावर मात केली हाेती. तसेच जून महिन्यातील पहिल्या सात दिवसांमध्ये केवळ ६०९ जण पाॅझिटिव्ह आले असून १,८७२ जणांनी काेराेनावर मात केली. ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरत आहे.
------------
नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे
काेराेना संसर्ग दिवसेंदिवस कमी हाेत असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शहरात फिरताना काेराेना नियमांचे पालन करावे. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ७ पथकांची नियुक्ती केली आहे. पथकांतील सदस्य शहरातील गर्दीवर वाॅच ठेवणार आहेत.