मराठी भाषा दिनावर काराेनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:31+5:302021-02-27T04:55:31+5:30
वाशिम : दरवर्षी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जाणारा मराठी भाषा दिन यावेळी काेराेना संसर्गवाढीमुळे हाेत नाही ...
वाशिम : दरवर्षी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जाणारा मराठी भाषा दिन यावेळी काेराेना संसर्गवाढीमुळे हाेत नाही आहे. तरीही काही मराठीप्रेमींनी या कार्यक्रमाचे आयाेजन ऑनलाईन पद्धतीने करून परंपरा खंडित हाेणार नाही, याची दक्षता घेतली आहे.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आपण ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करीत असतो. मराठी भाषेची अवस्था बिकट होत चाललेली आहे. भाषेवर समाज, संस्कृती टिकून असते. भाषा ही सशक्त आणि वृद्धिंगत होणारी हवी. यासाठी राजस्थान महाविद्यालयात दरवर्षी विविध कार्यक्रम घेत असतो; परंतु या वर्षी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे नियाेजन करून यामध्ये विद्यार्थी सहभागी हाेणार आहेत. या वर्षी कोरोनामुळे मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम राजस्थान महाविद्यालयाचे डाॅ. विजय एम. जाधव यांनी ऑनलाईन आयाेजित करून कार्यक्रमाची परंपरा खंडित हाेऊ दिली नाही. ऑनलाईन कार्यक्रम घेऊन मराठी भाषेवर समाज आणि संस्कृती टिकून आहे या विषयावर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी व मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
..............
राजस्थान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत असताे. यावर्षीही नियाेजन करण्यात आले हाेते. परंतु मधातच काेराेना संसर्ग वाढत असल्याने या कार्यक्रमाचे नियाेजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
डाॅ. विजय एम. जाधव, वाशिम