पावसाच्या रिपरिपतीही दिसला मतदानाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 03:21 PM2019-10-21T15:21:33+5:302019-10-21T15:21:54+5:30
कारंजा मतदारसंघातील आदर्श मतदान केंद्रावर पुष्प देऊन स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा: विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी मतदानास सुरुवात झाल्यानंतर कारंजा तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस पडायला सुरुवात झाली. तथापि, या पावसातही मतदारांचा उत्साह कायम राहिल्याचे दिसले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. या मतदान प्रक्रि येदरम्यान मतदारसंघातील आदर्श मतदान केंद्रावर मराठमोळ्या वेशभुषेत शालेय विद्यार्थीनींनी मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीसाठी कारंजा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांतून आपला मतदार निवडण्यासाठी मतदारांनी २१ आॅक्टोबर रोजी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येसाठी कारंजा मतदारसंघात ३५२ केंद्रांवर मतदानाची सुविधा करण्यात आली होती. या मतदान कें द्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर रिमझीम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मतदानावर या वेळेत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तथापि, या पावसाचा कुठलाही परिणाम मतदारांवर झालेला दिसला नाही. अगदी पावसातही विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे दिसले. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा करण्यात आली होती, तर आदर्श मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागत करण्यासाठी मराठमोळ्या वेशभुषेत शालेय विद्यार्थीनी पुष्प घेऊन उभ्या होत्या.