कर्नाटक, मराठवाडयातील कलींगड जिल्हयात!
By admin | Published: April 27, 2017 06:36 PM2017-04-27T18:36:01+5:302017-04-27T18:36:01+5:30
शिरपूर- जिल्हयात कलींगडाची नदीपात्रात शेती होत असतांनाही तुटवडयामुळे व्यापाऱ्यांकडून आंध्रप्रदेश, कनार्टक व मराठवाडयातून मोठया प्रमाणात कलींगड बोलाविल्या जात आहेत.
शिरपूर : उन्हाळयाच्या दिवसात कलींगडाला नागरिकांची पसंती दिसून येते. जिल्हयात कलींगडाची नदीपात्रात शेती होत असतांनाही तुटवडयामुळे व्यापाऱ्यांकडून आंध्रप्रदेश, कनार्टक व मराठवाडयातून मोठया प्रमाणात कलींगड बोलाविल्या जात आहेत.
जिल्हयात जागोजागी कलींगडांची दुकाने लागली असून १० रुपयांपासून तर १५ रुपये दराने या कलींगडाची विक्री व्यापाऱ्यांकडून केल्या जात आहे. शिरपूर जैन येथे दररोज दोन ते तीन ट्रक माल येत असून तो संध्याकाळपर्यंत संपत आहेत. अनेक लघुव्यावसायिकांनी हातगाडयांवर टरबुज चिरुन त्यावर चाटमसाला टाकूनही विक्री करुन जास्त उत्पन्न मिळवित आहेत. वाशिम जिल्हयात पैनगंगा नदीकाठावर व कारंजा तालुक्यात मोठया प्रमाणात याचे उत्पन घेतल्या जाते. व्यापारी ग्राहकांना १० ते १५ रुपये किलो दराने टरबुज विकत असले तरी व्यापाऱ्यांना ते खरेदी करतांना नगाप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. यावेळी लहान , मोठे फळ एकाच भावात व्यापाऱ्यांना मिळत असून एकत्रित मालाचा काटा तोल काटयावर करुन ट्रकचे वजन अंदाजे कमी करुन मालाची किंमत काढल्या जाते. यामुळे भाव स्थिर राहत नसून यामध्ये चढउतार दिसून येतो. सद्यस्थितीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, मराठवाडयातील कलींगडाचा माल मोठाय प्रमाणात बाजारात विक्रीस येत आहे.