बंजारा समाजाची काशी पोहरादेवी

By Admin | Published: September 18, 2014 01:17 AM2014-09-18T01:17:49+5:302014-09-18T01:17:49+5:30

बंजारा समाजाचे धर्मगुरु संत सेवालाल महाराज यांची समाधी.

Kashi Porhadevi of Banjara community | बंजारा समाजाची काशी पोहरादेवी

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी

googlenewsNext

मानोरा : संपूर्ण देशातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणारे पोहरादेवी गाव मानोरा तालुक्यात आहे. येथे संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरु. त्यांनी देशभर गायीच्या पाठीवर धान्याचा व्यापार केला. ज्यावेळी देशात दुष्काळ होता त्यावेळी त्यांनी धान्याची वाहतूक करुन लोकांना धान्याचा पुरवठा केला. आज पोहरादेवी येथे त्यांचे भव्य मंदिर उभे आहे. येथे दरवर्षी फार मोठी यात्रा भरते. तसेच मागील अनेक वर्षापासून जयंती उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. या उत्सवामुळे रामनवमी यात्रेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. या दोनही उत्सवात फरक एवढा आहे की रामनवमीला बोकडबळी जाते तर जयंती उत्सवात प्रात:काळी संपूर्ण गाव फुलाने सजवून सेवालालच्या गजराने गावातून दिंडी काढली जाते. या वेळेस बळीप्रथेला मात्र थारा दिला जातो.
दिवसेंदिवस जयंती उत्सवात मोठे प्रमाण होत असून गावोगावीसुद्धा हा उत्सव साजरा होताना दिसतो. बंजारा काशीमध्ये परप्रांतातून येणार्‍या भाविकांना पाहिजे त्या सोयीसुविधेचा अभाव दिसून येत आहे. जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाची काशी मानल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पोहरादेवीत संत सेवालाल, देवी जगदंबा, शामकीमाता, ज्योतीबाबा, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांचे मोठय़ा आस्थेने दर्शन दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते
संत सेवालाल महाराजांची समाधी व जगदंबा देवीचे मंदिर असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमी व संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरते. बोकडबळी प्रथा थांबविण्यासाठी संत महंत व सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनाने प्रयत्न केला. त्यामुळे मागील तीन-चार वर्षापासून पोहरादेवी यात्रेत जगदंबा माता मंदिर परिसरात बोकडबळी प्रथा बहुतांश कमी झाली आहे. ज्या देवीच्या मंदिरासमोर रक्ताचे पाट वाहत असत तिथे यज्ञ होमहवनाचे आयोजन अहिंसादूतांनी केले ते आजही होत आहे. बंजारा समाजाच्या काशीमध्ये रामनवमीला देश परदेशातून भाविक येवून दर्शनासाठी गर्दी करतात.

Web Title: Kashi Porhadevi of Banjara community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.