कास्तकारांची वाशिम जिल्हाकचेरीवर धाव

By admin | Published: June 6, 2014 12:15 AM2014-06-06T00:15:17+5:302014-06-06T00:33:43+5:30

शासनाचा आदेश असताना बँकांचा कर्ज पुनर्गठणास नकार

Kashkar's Washim district runs on the ground | कास्तकारांची वाशिम जिल्हाकचेरीवर धाव

कास्तकारांची वाशिम जिल्हाकचेरीवर धाव

Next

वाशिम: गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांचे कर्जाचे पूर्णगठण करण्याचा शासन आदेश असतांना सुध्दा अद्यापपर्यंत सर्वच बँकेनी पनर्गाठण करण्यास नकार दिल्यामुळे सर्वच भागातील शे तकर्‍यांनी जिल्हा कचेरीवर धाव घेवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
फेब्रुवारी मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीठीमुळे शेतकर्‍यांच्या हातून रब्बी पिके गेली त्यामुळे शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सक्तीची कर्ज वसुली करण्यास मनाई करुन शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठण करण्याचे बँकांना आदेश दिले मात्र प्रत्यक्षात एकाही बँकेने एकाही शेतकर्‍यांचे पुर्नगठण न केले नाही. त्यामुळे शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे भेट घेवून कर्ज पुर्नगठणाची मागणी केली.
शासनाचे स्पष्ट आदेश असतांना बँका शेतकर्‍यांना मदत करीत नसल्याचे त्यांनी आश्‍चर्य व्यक्त करुन जिल्हा उपनिबंधकांना सदर प्रश्न सोडविण्याच्या तोंडी सुचना केल्या मात्र पेरणीची वेळ जवळ येत असून बियाणे व खताची व्यवस्था नाही .
सोमवार दि.९ जून पर्यंत कर्जाचे पूर्नगठण करुन कर्ज वाटप न केल्यास प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिसोड तालुक्यातील सर्व शाखांना कुलुप लावण्याचे आंदोलन करणार असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

Web Title: Kashkar's Washim district runs on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.