कारंजा तालुक्यातील ५५ ग्रामसेवकांनी दिल्या बिडीओंना कार्यालयांच्या चाव्या !
By admin | Published: November 17, 2016 07:17 PM2016-11-17T19:17:17+5:302016-11-17T19:17:17+5:30
प्रलबिंत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवार पासून तालुक्यातील ग्राम सेवक कामबंद आदोलन सुरू असून या आंदोलनाचा एक भाग म्हणुन कारंजा
ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 17 : प्रलबिंत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवार पासून तालुक्यातील ग्राम सेवक कामबंद आदोलन सुरू असून या आंदोलनाचा एक भाग म्हणुन कारंजा तालुक्यातील ५५ ग्रामसेवकांनी ९१ ग्रामपंचायतच्या कारंजा पचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे कार्यालयाच्या चाव्या व कार्यालयीन शिक्के सुपुर्द करण्यात आल्यात.
या आंदोलनामुळे कामकाज प्रभावित होणार आहे. ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या प्रलबीत असून या मागण्या व समस्या न सुटल्याने ग्रामसेकव युनियनतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. नरेगा साठी स्वंतत्र यत्रंणा तयार करणे तसेच एक गाव एक ग्रामसेवक ही संकल्पना राबविणे या सह यामुळे कामकाज प्रभावित होउन सर्व सामान्याना झळ पोहचेल. योवळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश हवा, सचिव गजेंद्र पाखरे, उपाध्यक्ष वैशाली कांबळे, संजय मनवर,अमोल पाटील, अनिल ठोकबर्डे, धनजय चैधरी, गोपाल मिसाळ, बलदेव चव्हान, महेश राउत, राजू बन्नोरे, सुधाकर वंजारे यांच्या सह तालुक्यातील ५५ ही ग्रामसेवकांची ९१ ग्राम पंचायत कार्यालयाच्य चाव्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्या कडे जमा करण्यता आले.