केनवडचा शेतकरी पुत्र बनला असिस्टंट कमांडंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:23+5:302021-02-08T04:35:23+5:30
सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक युवक हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. रिसोड तालुक्यातील ...
सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक युवक हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. रिसोड तालुक्यातील पवन खराटे या युवकानेदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवून ध्येयपूर्तीसाठी त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. जिद्द, मेहनत, अभ्यासातील सातत्य, वरिष्ठांचे मार्गदर्शन, पेपर सोडविण्याचा सराव या बळावर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागला असून, यूपीएससीच्या परीक्षेत त्याला भारतातून १०९वी रँक मिळाली आहे. पवन खराटे याने गावाच नाव उज्ज्वल केले आहे शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिद्द, चिकाटी, योग्य मार्गदर्शन, प्रेरणा व प्रयत्न या सर्व गोष्टींचे सार्थक म्हणजे आजचे हे यश होय अशा प्रतिक्रिया पवन खराटे याने व्यक्त केली.