खडसे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
By admin | Published: March 22, 2017 02:59 AM2017-03-22T02:59:30+5:302017-03-22T02:59:30+5:30
व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व कार्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार.
वाशिम, दि.२१- तालुक्यातील उमरा शम. येथील शाहीर संतोष खडसे यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व कार्याबद्दल शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने १९ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात संतोष खडसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. उद्योग आणि खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, संमेलनाध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, मावळत्या संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, समाज कल्याण विभागाचे आयुक्त पीयूष सिंह, माजी आयुक्त आर. के. गायकवाड, जिल्हाधिकारी किरण गीते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, उपायुक्त भीमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते, महानगरपालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, सामाजिक न्यायमंत्र्यांचे प्रतिनिधी फडणवीस, सहायक उपायुक्त तथा वाशिमचे समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर आदींच्या उपस्थितीत संतोष खडसे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष खडसे यांच्या पत्नी रेखा खडसे, कवी जनार्दन भालेराव, सदानंद इंगोले आदींची उपस्थिती होती.