खैरखेड्यातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:02 PM2019-05-04T17:02:31+5:302019-05-04T17:02:38+5:30
राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे.
- यशवंत हिवराळे
राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे. पाणी व चाराटंचाईमुळे पशुपालकांनी आपली जनावरे जंगलात मोकाट सोडली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
डोंगरावळ व खडकाळ भागात वसलेल्या खैरखेडा येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने गावकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. गावातील बहुतांश नागरिकांची उपजिविका ही शेतीवरील कामावर आधारीत आहे. शेतीसिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेतीची कामे संपल्यानंतर रोजगारासाठी गावकºयांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते. जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्यात गावातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून, दूरवरून नदीपात्रातील झिºयातून दूषित पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागत आहे. चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी लगतच्या जंगलात जनावरे मोकाट सोडली आहेत. खैरखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाण्यासाठी गावकºयांची पायपिट सुरू आहे. दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकºयांनी केली.
सध्या खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खैरखेडा भागात सिंचन प्रकल्प उभारणे, रोजगाराचे साधन उपलब्ध करणे आवश्यक आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नाही. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
आशा निवास शेळके
सरपंच, खैरखेडा
खैरखेडा येथे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
संजय राठोड, ग्रामस्थ खैरखेडा
खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडे याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे. दूरवरून दूषित पाणी आणून तहान भागविण्याची वेळ आम्हा गावकºयांवर आली आहे.
- कनिराम राठोड, ग्रामस्थ, खैरखेडा
चारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. अनेक पशुपालकांनी जंगलात जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी गावकºयांची अपेक्षा आहे.
-दिलीप आडे, ग्रामस्थ खैरखेडा