येत्या डिसेंबरमध्ये खंडाळा वीज उपकेंद्र जनसेवत!

By admin | Published: November 10, 2016 04:40 PM2016-11-10T16:40:52+5:302016-11-10T16:40:52+5:30

येथील ‘ई-क्लास’ जमिनीवर खंडाळा वीज उपकेंद्राचे रखडलेल्या कामाबाबत लोकमतने ९ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी नागपूर येथील वीज

Khandala power sub-center Janasavat in December! | येत्या डिसेंबरमध्ये खंडाळा वीज उपकेंद्र जनसेवत!

येत्या डिसेंबरमध्ये खंडाळा वीज उपकेंद्र जनसेवत!

Next
>ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन, दि. 10 - येथील ‘ई-क्लास’ जमिनीवर खंडाळा वीज उपकेंद्राचे रखडलेल्या कामाबाबत लोकमतने ९ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी नागपूर येथील वीज वितरण कंपनीच्या टीमसह वाशिम येथील अधिका-यांनी भेट दिली  आणि येत्या डिसेंबरमध्ये उपकेंद्र सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिरपूर वीज उपकेंद्रांतर्गत सिंचनासाठी विजेची मागणी प्रचंड प्रमाणात होत असल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी प्रमाणात असल्याने शिरपूर, वसारी, दापुरी, करंजी, खंडाळा, वाघी, ढोरखेडा, शेलगाव येथील वीजपुरवठा अतिरिक्त वीज वापरामुळे सतत खंडित होत असे. म्हणून शिरपूर येथील ‘ई-क्लास’ जमिनीवर खंडाळा उपकेंद्राचे काम मागील दोन वर्षापूर्वी सुरु करण्यात आले. मात्र, उपकेंद्राचे हे काम अद्यापही पूर्ण झाले  नसल्यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच १० नोव्हेंबर रोजी वाशिम येथील वीज वितरणचे मुख्य अभियंता बन्सोडे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांच्यासह नागपूर चमूनी भेट दिली व पाहणी केली. तसेच येथे उपस्थिित नागरिकांना येत्या डिसेंबरपर्यंत उपके्रद्र सुरु होणार असल्याची हमी दिली. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

Web Title: Khandala power sub-center Janasavat in December!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.