खंडोबा देवस्थान वार्षिक महोत्सव : कबड्डी सामन्यात जय बजरंग संघ ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:48 PM2018-01-17T14:48:47+5:302018-01-17T14:57:36+5:30

शिरपूर जैन : येथील जय मल्हार खंडोबा देवस्थानच्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी सामन्यात गोभणीचा जय बजरंग संघ ब्रम्हा येथील जय बजरंग संघाला पराभूत करुन विजेता ठरला.

Khandoba Devasthan Annual Festival: Jai Bajrang Sangh becomes the winner of the kabaddi match | खंडोबा देवस्थान वार्षिक महोत्सव : कबड्डी सामन्यात जय बजरंग संघ ठरला विजेता

खंडोबा देवस्थान वार्षिक महोत्सव : कबड्डी सामन्यात जय बजरंग संघ ठरला विजेता

Next
ठळक मुद्देजय मल्हार खंडोबा देवस्थान महोत्सवानिमित्त शिरपूर येथे कबड्डीचे सामने आयोजित केले होते. कबड्डीच्या या अंतीम सामन्यात  ब्रम्हा येथील संघाचा गोभणी येथील जयबजरंग संघाने एकतर्फी पराभव करुन विजेता ठरला. विजेत्या संघाला माजी सभापती संजय शर्मा, विजय अंभोरे, उपसरपंच असलम परसुवाले, गणेश घोडमोडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

शिरपूर जैन : येथील जय मल्हार खंडोबा देवस्थानच्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी सामन्यात गोभणीचा जय बजरंग संघ ब्रम्हा येथील जय बजरंग संघाला पराभूत करुन विजेता ठरला. यावेळी दोन्ही संघाचे नाव जय बजरंग असल्याने बजरंगाने बजरंगाला हरविल्याची चर्चा होती.

जय मल्हार खंडोबा देवस्थान महोत्सवानिमित्त शिरपूर येथे कबड्डीचे सामने आयोजित केले होते. या सामन्यासाठी पहिले बक्षिस १५ हजार, दुसरे ११ हजार तर तिसरे बक्षिस ९ हजार रुपये होते. यासह विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. सदर बक्षिसे डॉ. श्याम गाभणे, सलीम गवळी,सुरेश घोडमोडे, पंकज देशमुख, रमेश इंगोले, बाबु गौरवे, नितिन भालेराव, शिवा सपकाळ यांच्याकडून देण्यात आली. कबड्डीच्या या अंतीम सामन्यात  ब्रम्हा येथील संघाचा गोभणी येथील जयबजरंग संघाने एकतर्फी पराभव करुन विजेता ठरला. तसेच या स्पर्धेत दुसºया क्रमांकावर ब्रम्हा येथील जय बजरंग संघ, तृतीय बॉईज जळगाव खांदेश, चवथा जय शिवाजी संघ केनवड, पाचवा एकता संघ वाघी, सहावा छावा संघ भापूर, सातवा जयबजरंग खडकी मसला, आठवा एकता हिंगोली संघ, नववा आर्य संघ आघाडी सिल्लोड यांनी प्राप्त केला. विजेत्या संघाला माजी सभापती संजय शर्मा, विजय अंभोरे, उपसरपंच असलम परसुवाले, गणेश घोडमोडे यांच्याहस्त ेबक्षीस वितरण करण्यात आले. या कबड्डी सामन्याचा लाभ तीन दिवस हजारो प्रेक्षकांनी घेतला.

Web Title: Khandoba Devasthan Annual Festival: Jai Bajrang Sangh becomes the winner of the kabaddi match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.