खरीप पीक कर्ज विषयक समस्या ‘जैसे थे’!
By admin | Published: June 18, 2017 01:50 AM2017-06-18T01:50:53+5:302017-06-18T01:50:53+5:30
सहायक निबंधकांचे पथक गायब : संपर्क साधूनही मिळेना प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील शेतकर्यांना सेवा सहकारी संस्था सोसायटीमार्फत किंवा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत खरीप पीक कर्ज वाटपाबाबत जाणवणार्या समस्या सोडविण्याकरिता सहायक निबंधक सहकारी संस्थेने विशेष पथक नेमले; परंतू थकीत कर्जासह उद्भवलेल्या इतर समस्या आजही ह्यजैसे थेह्ण असून, पथकातील अधिकारी, कर्मचार्यांची शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दमछाक होत आहे.
सन २0१७-१८ च्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणर नाही, याची काळजी घेण्यात येत असून, मे अखेरपर्यंंंत पीक कर्ज वाट पाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी मे अखेरपर्यंंंत पीक कर्ज घेण्याबाबत तत्काळ संबंधित सेवा सहकारी संस्थेचे गट सचिव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करत तत्कालीन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी पीक कर्जविषयक समस्या सोडविण्याकरिता विशेष पथक गठित केले होते.
त्यानुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकासह जी.बी. राठोड एम. जे. भेंडेकर, वाशिम सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, बी.ए. कोल्हे, रिसोड सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, आर.आर. सावंत, मालेगाव सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, पी.टी. सरकटे, मंगरूळपीर सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, पी.एन. गुल्हाणे, कारंजा सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, डी.डी. दारमोडे मानोरा सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक अथवा आर.बी. राठोड यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर शेतकर्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. सोबतच संबंधित सर्व दुरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले; मात्र जिल्हा उपनिबंधकांचा हा सकारात्मक प्रयोग पूर्णत: फसला आहे.
शेतकर्यांना कर्ज मिळणेदेखील मुश्कील झाले असून, ज्या शेतकर्यांना कर्ज मिळाले, त्यांची रक्कम बँकेत पडून आहे, कर्जमाफीचा निर्णय अद्याप शासनस्तरावर प्रलंबित असून, १0 हजार रुपये तातडीच्या कर्जासाठीदेखील बँका नकार दर्शवित आहेत. यासह इतरही प्रश्न सद्या गंभीर झाले असताना ते निकाली काढण्याकरिता कुठलेच पथक कामी पडत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.