वाशिम जिल्ह्यात १८ टक्क्यांवर अडकली खरीप पीक कर्ज योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:37 PM2019-07-09T16:37:23+5:302019-07-09T16:37:28+5:30

यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत केवळ १८.४० टक्के पीक कर्ज वाटप होणे शक्य झाले आहे. 

Kharif crop loan scheme stuck in Washim district at 18 percent! | वाशिम जिल्ह्यात १८ टक्क्यांवर अडकली खरीप पीक कर्ज योजना!

वाशिम जिल्ह्यात १८ टक्क्यांवर अडकली खरीप पीक कर्ज योजना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षीप्रमाणेच याहीवर्षी खरीप पीक कर्ज घेणाºया शेतकºयांचा आकडा अगदीच कमी झाला असून यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत केवळ १८.४० टक्के पीक कर्ज वाटप होणे शक्य झाले आहे. 
गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना १५०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अखेरपर्यंत केवळ ३३७ कोटींचे (२३ टक्के) वितरण झाले. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यापैकी मंगळवार, ९ जुलैपर्यंत २८१ कोटी अर्थात १८.४० टक्केच पीक कर्जाची उचल शेतकºयांकडून करण्यात आली आहे. सन २०१८ मध्ये तुलनेने कमी पर्जन्यमान झाले. यामुळे खरीप हंगामापासून शेतकºयांना विशेष उत्पन्न घेता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने अनेक शेतकºयांनी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आधीच्या कर्जाची फेड केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळणे अशक्य झाल्यानेच मागणी घटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दुसरीकडे काही राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज वितरणास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचीही ओरड होत आहे.
 
बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमिळून ५०४ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले असून अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडीयन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडीकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, देना बँकेला ७१४.२० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट मिळालेले आहे. यासह अ‍ॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय व आयडीबीआय अशा चार खासगी बँकांना ७७.७० कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले असून ९ जुलैपर्यंत केवळ २८१ कोटींचे वाटप शक्य होऊ शकले आहे.

Web Title: Kharif crop loan scheme stuck in Washim district at 18 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.