वाशिम जिल्ह्याची खरीप हंगाम पैसेवारी ५८ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:51 PM2017-10-01T17:51:31+5:302017-10-01T17:51:31+5:30

Kharif season of the Washim district is 58 paise | वाशिम जिल्ह्याची खरीप हंगाम पैसेवारी ५८ पैसे

वाशिम जिल्ह्याची खरीप हंगाम पैसेवारी ५८ पैसे

Next

वाशिम: सन २०१७-१८ मधील खरीप हगामाकरिता जिल्ह्याची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ५८ पैसे इतकी निघाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रविवारी कळविण्यात आले आहे.

वाशिम तालुक्यातील १३१ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५५ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची नजर अंदाज पैसेवारी ६० पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची नजर अंदाज पैसेवारी ६८ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५५ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५४ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच ७९३ महसुली गावांची नजर अंदाज पैसेवारी ही ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: Kharif season of the Washim district is 58 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.