चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:13+5:302021-05-08T04:43:13+5:30

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, यंदा चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. कोरोनाकाळात कृषी सेवा केंद्रांमध्ये ...

Kharif sowing planning on four lakh hectares! | चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन !

चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन !

Next

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, यंदा चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. कोरोनाकाळात कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर बांधापर्यंत खते, बियाणे पोहचविण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्ह्यासाठी ६१ हजार मे.टन खतसाठा मंजूर असून त्यापैकी ३५ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. यंदाही खरीप हंगामावर कोरोनाचे सावट असून, शेतकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. खतांसंदर्भात शेतकºयांची गैरसोय होऊ नये, तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ६१ हजार ८०० मेट्रिक टन खताची मागणी केली असून ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. यावर्षी ३ लाख हेक्‍टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज असून, बियाण्याची टंचाई भासू नये म्हणून ४०० हेक्‍टरवर रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी करून अतिरिक्त ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी सांगितले.

००००००

बॉक्स

शेतकºयांच्या बांधावर बियाणे, खते

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात शेतकºयांची गैरसोय होऊ नये तसेच कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित बियाणे, खते, किटकनाशके हे शेतकºयांच्या बांधावर पोहचविण्यात येणार आहेत. गतवर्षीदेखील हा उपक्रम कृषी विभागाने राबविला होता. यंदाही खरीप हंगामावर कोरोनाचे सावट असून, बांधावर खते, बियाणे पुरविण्यात येणार आहेत.

..............

बॉक्स

सात भरारी पथकांचे गठण

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकºयांची लुबाडणूक होऊ नये, शासकीय किंमतीपेक्षा अधिक रकमेची मागणी होऊ नये म्हणून जिल्ह्यात सात भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. या भरारी पथकांच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. शेतकºयांना काही अडचणी, तक्रारी असतील तर तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कषी विकास अधिकारी बंडगर यांनी केले.

०००००००००००

कोट

यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन आहे. जिल्ह्याची गरज लक्षात घेता मुबलक खताची मागणी नोंदविली असून, आतापर्यंत ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून बांधावर खत, बियाणे पुरविण्यात येणार असून, जिल्ह्यात सात भरारी पथकांचे गठणही करण्यात आले.

- विकास बंडगर

कृषी विकास अधिकारी, वाशिम

..............

असे आहे पीकनिहाय पेरणीचे नियोजन

पीक हेक्टर

सोयाबीन ३,००,०००

तूर ६०,०००

कापूस २७,०००

उडीद १०,०००

मूग ७,०००

खरीप ज्वारी ११५०

मका ३००

बाजरी १००

तीळ १००

इतर ८००

Web Title: Kharif sowing planning on four lakh hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.