पाणीटंचाई कृती आराखड्याला ‘खोे’
By admin | Published: January 24, 2017 07:23 PM2017-01-24T19:23:20+5:302017-01-24T19:23:20+5:30
संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा डिसेंबर महिन्यात तयार केला
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24 - संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा डिसेंबर महिन्यात तयार केला जातो. यावर्षी जानेवारीच्या तिसºया आठवड्यातही हा आराखडा तयार झाला नाही.
वाशिम, दि. 24 - संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा डिसेंबर महिन्यात तयार केला जातो. यावर्षी जानेवारीच्या तिसºया आठवड्यातही हा आराखडा तयार झाला नाही.
उन्हाळ्यात कोणकोणत्या गावांत पाणीटंचाई भासणार, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कोणत्या, निधीची तरतूद किती, अंमलबजावणी कधी होणार, याचा सारासार विचार करून पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी २४ जानेवारीपर्यंतही हा आराखडा तयार झाला नाही. पंचायत समिती स्तरावरून आता हा आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर होतो की यामध्ये दुरूस्त्या सूचविल्या जातात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.