मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमसाठी सरसावले दानशुर; शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:35 PM2018-02-01T14:35:02+5:302018-02-01T14:36:26+5:30
आता ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार मिळाला आहे.
- नाना देवळे
मंगरुळपीर : तालुक्यातील लाठी येथील भानुदास सुर्वे यांचा १७ वर्षीय मुलगा मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असताना त्याच्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने हताश झाले होते. यासाठी त्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली. लोकमतनेही ३० जानेवारीच्या अंकात लोकमत मदतीचा हात या सदरांतर्गत ‘मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन केले. आता ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार मिळाला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील रहिवासी भानुदास सुर्वे हे अठराविश्वे दारिद््रयात मोलमजुरी करून कुटुंंबाचे उदरभरण करतात. त्यांच्या ओम १७ वर्षीय मुलास गेल्या दोन वर्षांपासून मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रासले आहे. हे कळल्यानंतर भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी अर्थात ओमचे गरीब मातापिता हताश झाले. तथापि, त्यांनी मोलमजुरी करीत पोट उपाशी ठेवून ओमवर उपचार केले. त्यासाठी नातेवाईकांकडून मदत घेण्यासह हातउसणवारीही केली आधि चार वेळा त्याच्यावर वर्धा, वणी आणि अकोला येथे चार वेळा शस्त्रक्रियाही केल्या; परंतु ओमच्या दुदैर्वाने त्या चारही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरील पुढील उपचारासाठी एक लाखाहून अधिक रुपयांची गरज होती; परंतु त्याचे भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी भूमिहीन शेतमजूर एवढी मोठी रक्कम जुळवू शकत नव्हते. पोटच्या गोळ्याचा वाढता आजार पाहून त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू अनावर होत असायचे. त्यांची ही केविलवाणी व्यथा कळल्यानंतर लोकमतच्यावतीने ३० जानेवारीच्या अंकात मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना त्यांच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. याची दखल घेत अकोला येथील महावितरणचे अधिकारी संतोष खुमकर या दानशूर व्यक्तीने २१ हजार रुपयांचा धनादेश ओमवर उपचार करणाºया रुग्णालयाच्या नावे दिला. दरम्यान, ओमच्या माता-पित्याच्या आवाहनानंतर शेलूबाजार येथील रुग्णसेवा युवा ग्रुपने १५ हजार, लाठीवासियांनी १५ हजार ९००, जय बजरंग मित्रपरिवार शेलूबाजारने ११ हजार, बाळासाहेबर ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना शेलुबाजारने ७६०० रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोलाच्यावतीने २१ हजार, तसेच मंगरुळपीर येथील एका नागरिकाने ८०० रुपयांची मदत केली आहे. या सर्वांचे ओमच्या मातापित्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.