पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:07+5:302021-07-07T04:51:07+5:30
वाशिम : पेट्राेल, डिझेलचे दरराेज वाढते भाव पाहता अनेक उद्याेग धंदे, किराणामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम : पेट्राेल, डिझेलचे दरराेज वाढते भाव पाहता अनेक उद्याेग धंदे, किराणामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या भाववाढीमुळे किराणा, भाजीपाला माेठ्या प्रमाणात महागल्याने महिलांचे किचन काेलमडले असल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी २०२१ पासून सतत वाढत असलेल्या पेट्राेल, डिझेल दर वाढीमुळे सर्वच वस्तूच्या किमती माेठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. यामध्ये बाधकाम साहित्य, भाजीपाला, इलेक्ट्राॅनिक वस्तू, शेती साहित्याचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे बैलांची संख्या कमी झाल्याने शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत करताेय; परंतु पेट्राेल, डिझेल दर वाढीमुळे शेतीही महागली असल्याने शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या खर्चात वाढ दिसून येत आहे. आधी ५०० रुपये एकर पेरणी हाेत असलेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना ७०० रुपये माेजण्याची वेळ आलेली दिसून येत आहे. वाशिम शहरात कांदा, आलूही इतर जिल्ह्यातून वाशिममध्ये येत असल्याने पेट्राेल भाववाढीमुळे यातही किलाेमागे ५ ते १० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसनू येत आहे. वाशिम शहरात काही दिवसांआधी १०० रुपये लिटर असलेले पेट्राेल १०७ रुपये लिटर घेण्याची वेळ वाहनचालकांवर येऊन ठेपली आहे. ही दरवाढ कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले असले तरी अद्याप भाव वाढ ‘जैसे थे’च दिसून येत आहे.
.................
ट्रॅक्टरची शेतीही महागली...
शेतकरी आधुनिकतेकडे वळल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे. बैलांच्या साहाय्याने मशागतीचे प्रमाण कमी झाले आहे. आता जवळपास प्रत्येक जण ट्रॅक्टरने शेती करताेय. मात्र, डिझेलच्या वाढलेल्या दराने ट्रॅक्टर मालकांनी शेती मशागतीच्या भावात वाढ केल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एका एकरामागे शेतकऱ्यांना २०० रुपयांचा फटका बसत आहे.
............
घर चालविणे झाले कठीण
महागाई वाढली की, घर चालविणे खूप कठीण जातेय. पेट्राेल, डिझेल दरवाढीमुळे घरगुती साहित्यासह भाजीपाल्याच्या दरामध्ये खूप माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारने या भाववाढीचा विचार करता महागाई कमी करणे गरजेचे आहे.
- शिवानी नागेश काळे, गृहिणी, वाशिम
पेट्राेल, डिझेलचे दर वाढल्याने आम्ही कडधान्यावर भर दिला आहे. २० ते २५ रुपये किलाेप्रमाणे मिळणारी भाजी आजच्या घडीला ५० ते ६० रुपयांच्या वर पाेहोचली आहे. अशा परिस्थितीत घर चालविणे कठीण जात आहे.
- उज्ज्वला खानझाेडे,
गृहिणी, वाशिम
.............
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव वाढत आहे. त्यात आतापर्यंत माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे पेट्राेल, डिझेल महागल्याने इतरही वस्तूंचे भाव वाढले आहेत.
- अनिल केंदळे,
पेट्राेल पंप संचालक, वाशिम
...........
माेठ्या प्रमाणात पेट्राेल, डिझेलच्या वाढलेल्या दरवाढीमुळे वाहतूक महागली. वाहतूक महागल्याने भाजीपाल्यामधील विशेष परजिल्ह्यातून येणाऱ्या भाज्यांचे भाव वाढले आहेत.
- सागर माेहळे,
भाजीपाला विक्रेते