मुंगळा येथील कोल्हापूरी बंधा-यातून पाण्याची गळती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:43 PM2017-10-15T19:43:26+5:302017-10-15T19:45:05+5:30
मुंगळा : मुंगळा येथे मार्णा नदीवर २०-२५ वर्षापुर्वी कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. सदर बंधारा नादुरूस्त असल्याने पाण्याची गळती होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंगळा : मुंगळा येथे मार्णा नदीवर २०-२५ वर्षापुर्वी कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. सदर बंधारा नादुरूस्त असल्याने पाण्याची गळती होत आहे.
शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून मुंगळा येथे कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. गतवर्षी २० लाख रुपये खर्चून या बंधाºयाच्या दुरूस्ती करण्यात आली. मात्र, गेटचे काम अपूर्ण राहिल्याने बंधाºयातून पाणी गळती झाली. परिणामी, आता बंधाºयात पाणी नसल्याने रब्बी हंगामात शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने याकडे लक्ष देऊन बंधाºयाची दुरूस्ती करावी, अशी मागणी गणेश मोहळे, भागवत राउत, पिंटू राउत, गजाननआप्पा महाजन, विलास राउत, रामदास घुगे, शेषराव घुगे, रवि मोळळे, गजानन मोहळे, विठ्ठल राउत, बाबुराव वानखडे आदी शेतकºयांनी केली आहे.