लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:55 PM2019-02-16T14:55:47+5:302019-02-16T14:55:56+5:30
राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडानजिकच्या नदीवर लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा कोरडा ठण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडानजिकच्या नदीवर लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा कोरडा ठण आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचा काहीच फायदा शेतकरी व ग्रामस्थांना होत नसून, यामुळे परिसरातील महिलांना पाण्यासाठी किलोमीटर अंतर भटकंती करावी लागत आहे.
शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, नदीपात्रात पाणी थांबून परिसरातील पाणीपातळी टिकून राहावी, या उद्देशाने मालेगाव तालुक्यातील खैरखेडा नजिकच्या नदीवर सिंचन विभागाच्यावतीने गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून कोल्हापूरी बंधारा उभारण्यात आला; परंतु योग्य नियोजन नसल्याने या कोल्हापूरी बंधाºयात हिवाळ्यात पाण्याचा थेंबही साठला नाही. त्यामुळे हा बंधारा केवळ नावापुरताच राहिला असून, आता येथील महिलांना पाण्यासाठी व कपडे धुण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. या बंधाºयाची अवस्थाही वाईट झाली असून, लघू पाटबंधारे विभागाने याची दखल घ्यावी आणि बंधाºयाची आवश्यक दुरुस्ती करून त्यात पाणी थांबविण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.