रोहणा येथील कोल्हापूरी बंधारा नादुरूस्त; शेतात घुसले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:09 PM2018-08-27T15:09:49+5:302018-08-27T15:10:22+5:30
साखरडोह (वाशिम) - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरडोह (वाशिम) - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.
शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून रोहणा येथे कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयाची नियमित देखभाल, दुरूस्ती नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत आहे. पुरात वाहून आलेली झाडेझुडपे बंधाºयाच्या गेटजवळ अडकली आहेत. पाणी अडविण्यासाठी लावण्यात आलेले गेट अद्याप काढण्यात आले नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतात येते. पावसाळा संपला की नदीचे पाणी वाहुन न जाता त्या ठिकाणी थांबावे यासाठी रोहणा येथील बंधाºयाला गेट आहेत. सदर गेट काढणे किंवा बसविणे या बाबीकडे कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यापासून बसविण्यात आलेले गेट काढले नसल्याने पुराचे पाणीसुध्दा शेतामध्ये घुसते. संबंंिधत विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी केली.