शिरपूरच्या कुस्तीसंग्रामात कुरूडवाडीच्या महारुद्रची बाजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 02:25 PM2019-03-11T14:25:42+5:302019-03-11T15:33:06+5:30

महासंग्रामात कुरुडवाडीच्या महारुद्र काळेने देवठाण्याच्या गजाननला चित करीत एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेवर नाव कोरले.

Kurudwadi's Maharudra winner of wrestilin compitation at Shirpur jain | शिरपूरच्या कुस्तीसंग्रामात कुरूडवाडीच्या महारुद्रची बाजी  

शिरपूरच्या कुस्तीसंग्रामात कुरूडवाडीच्या महारुद्रची बाजी  

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिरपूर येथे १० मार्च रोजी ओंकारगीर कुस्ती मंडळाच्यावतीने कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला होता. या महासंग्रामात कुरुडवाडीच्या महारुद्र काळेने देवठाण्याच्या गजाननला चित करीत एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेवर नाव कोरले.
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या मैदानावर ओंकारगीर कुस्ती मंडळाच्यावतीने कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला जातो. त्यानुसार या वर्षीही १० मार्च रोजी कुस्त्यांचा महासंग्राम संपन्न झाला. या महासंग्रामाचे उद्घाटन संस्थानचे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्त्याचा महासंग्रामात महाराष्ट्रासह दिल्लीच्या पैलवानांनी ही सहभाग घेतला होता. यामहा संग्रामातील पहिले बक्षीस  उमेश इंगोले, रमेश इंगोले यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये, तसेच गणेश घोडमोडे यांच्यावतीने चांदीची गदा ठेवण्यात आली होती. याचा मानकरी हिंगोली जिल्ह्यातील देवठाणा येथील गजानन पैलवान यास चित करून कुरूडवाडीचा महारुद्र काळे हा विजेता ठरला. अयुब ठेकेदार आणि विलास गवळी यांच्या ७१ हजाराच्या बक्षिसाचा मानकरी कुरूडवाडी येथील सागर माटे, प्रशांतनाना देशमुख आणि अरुण कालवे यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या ५१ हजाराच्या तिसºया बक्षीसाचा मानकरी हिंगोलीचा ज्ञानेश्वर गादेकर, रमजान रेघीवाले दस्तगीर पैलवान यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या ४१ हजारांच्या चौथ्या बक्षीसाचा मानकरी आटपाडीचा संदीप काशीद ठरला. पाचव्या क्रमांकाचा मानकरी वाशिमचा भाऊ पांढरे, सातव्या क्रमांकाचा मानकरी इंदापूरचा सचिन वाघ, सातव्या क्रमांकाचा मानकरी शिरपूरचा शाहरुख, आठव्या क्रमांकाचा मानकरी लोहगावचा ज्ञानेश्वर, नवव्या क्रमांकाचा मानकरी सागर, दहाव्या क्रमांकाचा मानकरी  निमगावचा विजय, तर अकराव्या क्रमांकाचा मानकरी नंदू घोडके हा ठरला. उमेश इंगोले, रमेश इंगोले या भावंडांनी ठेवलेले एक लाख रुपयांचे प्रथम बक्षीस त्यांच्याच हस्ते आणि गणेश घोडेमोडे यांनी ठेवलेली चांदीची गदा हे बक्षीस त्यांच्याच हस्ते विजेता महारुद्र काळे यास देण्यात आले. यावेळी अशोकराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश भालेराव, सुदर्शन गाभणे, आशीष देशमुख, पंजाब नाईक, राजू कुंडलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. कुस्त्यांच्या महासंग्राम यशस्वी आयोजनासाठी ओंकारगीर कुस्तीगीर मंडळाचा पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले, तर संभाजी नवयुवक मंडळाच्यावतीने कुस्त्यासाठी आलेल्या राज्यभरातील पहिलवान व त्यांच्या सहकाºयांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था केली होती.

Web Title: Kurudwadi's Maharudra winner of wrestilin compitation at Shirpur jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.