मजुरांना वृक्षारोपणाची मजूरी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:56 PM2019-12-03T15:56:48+5:302019-12-03T15:56:57+5:30

आता २९ नोव्हेंबर रोजी ८.४७ लाखांचा निधी मिळाला असून, लवकरच मजुरांना मजूरीचे पैसे मिळणार आहेत.

The laborers will receive the wages of the plantation | मजुरांना वृक्षारोपणाची मजूरी मिळणार

मजुरांना वृक्षारोपणाची मजूरी मिळणार

Next

वाशिम : १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत अमरावती विभागात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे ३.७५ लाख रोपांची लागवड केली होती. निधीअभावी मजूरी व पुरवठा, सामग्रीचे देणे बाकी होते. आता २९ नोव्हेंबर रोजी ८.४७ लाखांचा निधी मिळाला असून, लवकरच मजुरांना मजूरीचे पैसे मिळणार आहेत.
हरित महाराष्ट्र संकल्पनेंतर्गत सन १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्षरोपण कार्यक्रमांतर्गत राज्यात विभाग निहाय, जिल्हा व यंत्रणानिहाय उद्दिष्टांचे वाटप करण्यात आले होते. त्यानुसार उद्योग विभागाला राज्यात १५ लाख ४५ हजार ३०० वृक्षारोपणाचे उद्दिष्ट मिळाले होते. यामध्ये अमरावती विभागाच्या हिश्श्यावर ३ लाख ७३ हजार ८५० उद्दिष्ट आले होते. विहित कालावधीत वृक्षारोपण केल्यानंतर मजूरी व पुरवठा, सामग्रीसाठी निधीची आवश्यकता होती. दीर्घ प्रतिक्षेनंतर आता २९ नोव्हेंबर रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने वृक्षारोपणासाठी मजूरी म्हणून ९.२ लाख रुपये आणि पुरवठा व सामग्रीसाठी २६.९८ लाख रुपये वितरित करण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुसार अमरावती विभागात मजूरीसाठी २ लाख १२ हजार रुपये आणि पुरवठा व सामग्रीसाठी ६.३५ लाख रुपये मिळणार आहेत.

Web Title: The laborers will receive the wages of the plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम