अनेक बाबींचा अर्थसंकल्पात अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:40 AM2021-03-10T04:40:44+5:302021-03-10T04:40:44+5:30
रिसाेड : राज्याचे अर्थसंकल्पात महात्मा फुले कर्ज माफी योजनेत एकोणविस हजार कोटी रूपये वाटप केल्याचे सांगीतले. पंरतु पात्र ...
रिसाेड : राज्याचे अर्थसंकल्पात महात्मा फुले कर्ज माफी योजनेत एकोणविस हजार कोटी रूपये वाटप केल्याचे सांगीतले. पंरतु पात्र असतानाही कर्ज माफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार कि नाही. या बाबतीत मात्र अर्थमंत्र्यानी मौन पाळले. यासह अनेक बाबी अर्थसंकल्पात नसल्याचे मत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले.
अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी
शेलुबाजार : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम या गौणखनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे.हे थांबविण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागांत पाणीटंचाईच्या झळा
अनसिंग : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागला असतानाच ग्रामीण भागांत पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. सहाही तालुक्यात मिळून २५पेक्षा अधिक गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
खरीप हंगामासाठी माहितीचे संकलन
ताेंडगाव : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कर्ज वितरण, वीज जोडणीच्या संख्येसह इतर माहितीचे संकलन केले जात आहे.
कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन
वाशिम :कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यात रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर प्रवास केलेल्या, विशेषत: ज्या भागामध्ये संसर्ग अधिक आहे, अशा भागात प्रवास करून आलेल्या सर्व नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहेत.
रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष
मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हे दाखल झाले; मात्र या प्रकरणाचा तपास अत्यंत संथगतीने सुरू असून, बहुतांश आरोपी अद्याप हाती लागलेले नाहीत.
मानोऱ्यात वाढताहेत काेराेना बाधित
वाशिम: मानोरा तालुक्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यात मानोरा शहरासह तालुक्यातील झपाटयाने काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनातर्फे तालुकयातील बहुतांश गावात आराेग्य तपासणी करण्यात येत आहेे. सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतिने नागरिकांना करण्यात येत आहे.