शेतमाल धनादेशाचा लोचा

By admin | Published: November 19, 2016 02:27 AM2016-11-19T02:27:32+5:302016-11-19T02:27:32+5:30

मध्यवर्ती बँकेत सर्वाधिक शेतकर्‍यांचे खाते असल्याने शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Lack of commodity check | शेतमाल धनादेशाचा लोचा

शेतमाल धनादेशाचा लोचा

Next

वाशिम, दि. १८- ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर, नोटांच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. बाजार समिती किंवा नाफेडमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर धनादेशद्वारे प्राप्त होणारी रक्कम मध्यवर्ती बँकेतून कधी मिळेल, या शंकेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.
देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १000 रुपयांची नोट रद्दबातल ठरविण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून चलनातून बाद ठरलेल्या नोटा बदलविण्यासाठी नागरिकांच्या रांगा बँकांसमोर लागत आहेत. चलनातील नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. या तुटवड्यामुळे मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवाव्या लागल्या. शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार धनादेशद्वारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी केल्यानंतर बाजार समित्या पूर्ववत झाल्या तसेच नाफेडद्वारे शेतमाल खरेदी सुरू झाली. शेतमाल विक्रीनंतर धनादेशाद्वारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात शेतमालाची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात दीड लाखांवर शेतकर्‍यांकडे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही व्यवहारावर काही निर्बंध आणले. मध्यवर्ती बँकेला जून्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली. मध्यवर्ती बँकेकडे पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतमाल विक्री केल्यानंतर मध्यवर्ती बँकेतून वेळेवर ही रक्कम मिळाली नाही तर, या शंकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार असलेल्या शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. राष्ट्रीयीकृत व अर्बन बँकेचे खातेदार असलेले शेतकरी मात्र शेतमाल विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र आहे; मात्र अशा शेतकर्‍यांची संख्या अल्प असल्याने बाजार समित्यांमधील आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे.

Web Title: Lack of commodity check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.