वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:35 PM2017-11-11T14:35:31+5:302017-11-11T14:42:48+5:30

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे

Lack of facilities in APMC in Washim district! | वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकºयांची गैरसोय मुक्काम पडल्यास घ्यावा लागतो हॉटेलचा आधार

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे. एखादवेळी मुक्काम पडल्यास त्यांना नाईलाजास्तव हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतीत अहोरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकवत असलेल्या शेतमाल विक्रीचे हक्काचे ठिकाण म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. यामाध्यमातून बाजार समित्यांनाही वर्षाकाठी लाखो, करोडो रुपयांचा सेस मिळतो. त्यातून शेतकºयांसाठी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील एकाही बाजार समितीचे विशेष लक्ष असल्याचे दिसत नाही. रिसोडमधील बाजार समितीत ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा माल ठेवला जातो. पिण्याच्या पाण्याचा अभाव असून शेतकरी निवास तकलादू ठरले आहे. गोदाम व्यापाºयांना भाड्याने दिले जाते. लोणी येथील उपबाजार निर्मितीचे कामही रखडले आहे. शिरपूरच्या उपबाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७० लाखाच्या आसपास असताना विकास मात्र नगण्य आहे. याठिकाणी शेतकरी निवास नाही, गुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, शेतमाल ठेवायला अपूरी जागा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनसिंग उपबाजारातही शेतकºयांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तालुकास्थळी असणाºया बाजार समित्यांमध्येही सुविधा निर्माण करण्याकामी संचालक मंडळाचे तद्वतच प्रशासनाचे बहुतांशी दुर्लक्ष झाल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. 

Web Title: Lack of facilities in APMC in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती