शासकीय आo्रमशाळेत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:03 AM2017-08-12T02:03:20+5:302017-08-12T02:03:30+5:30

शेलूबाजार  : येथील शासकीय आo्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याबरोबर याच भागात दौर्‍यावर असलेले शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी आo्रमशाळेला ११ ऑगस्ट रोजी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांना अनेक सुविधांचा अभाव येथे आढळून आल्याने याबाबत आपण संबधितांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Lack of facilities in Government Offices | शासकीय आo्रमशाळेत सुविधांचा अभाव

शासकीय आo्रमशाळेत सुविधांचा अभाव

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरण पाहणीत अनेक असुविधा आल्यात पुढे


लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार  : येथील शासकीय आo्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याबरोबर याच भागात दौर्‍यावर असलेले शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी आo्रमशाळेला ११ ऑगस्ट रोजी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांना अनेक सुविधांचा अभाव येथे आढळून आल्याने याबाबत आपण संबधितांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
११ ऑगस्ट रोजी येथील शासकीय आo्रमशाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. १0 ऑगस्ट रोजी येथे ठेवण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना रक्तवाढ करण्याच्या गोळय़ा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मळमळ झाल्याचे सांगण्यात आले. असे असले, तरी डॉ. सुभाष राठोड व या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य महाकाळ यांना सदर घटनेची कल्पना होताच त्यांनी भेट दिली असता येथे असलेल्या असुविधांची जाण झाली. विशेष म्हणजे, येथे अधीक्षकच नसल्याने या आo्रमशाळेचा कारभार मुख्याध्यापकांच्या भरवशावर चालतो आहे. 
भाजीपाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, त्यामध्ये आलूला कोंब फुटले होते, तर इतरही भाजीपाला निकृष्ट आढळून आला. इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मुलींच्या खोल्यांना खिडक्या दिसून आल्या नाहीत तर शौचालय, स्वच्छतागृहामध्येही घाण दिसून आली. ज्या रूममध्ये विद्यार्थी राहतात, त्यामध्ये मोकळी हवा येत नसल्याने गुदमरल्यासारखे होत असल्याचे दिसून आले. शासनाच्यावतीने लाखो रुपये या आo्रमशाळेवर खर्च केल्या जात असताना पाहिजे त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचे आढळून आल्याने आपण यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार देणार असल्याचे डॉ. सुभाष राठोड यांनी सांगितले.
 यावेळी त्यांच्यासोबत काही शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचीही विचारपूस केली, तेव्हा विद्यार्थ्यांनीही त्यांना असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्यात. यावेळी आo्रमशाळेचे मुख्याध्यापक विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसोबत रुग्णालयात गेले होते, तर काही कर्मचारी यावेळी हजर होते. 
 

Web Title: Lack of facilities in Government Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.