कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शनाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:39+5:302021-08-12T04:46:39+5:30
उडीद, मूग, सोयाबीन, तूर आदी प्रमुख पिकांवर गेल्या आठवडाभरापासून किडींचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यात शेतकरी फवारणी करीत असले तरी ...
उडीद, मूग, सोयाबीन, तूर आदी प्रमुख पिकांवर गेल्या आठवडाभरापासून किडींचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यात शेतकरी फवारणी करीत असले तरी लगेचच पाऊस पडत असल्याने त्याचा फारसा फायदाही होताना दिसत नाही. अशात कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असताना अनेक गावांत कृषी विभागाचे कर्मचारी पीक पाहणीही करण्यास उदासीन असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
^^^^^
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे विविध गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी बँकेत धाव घेत आहेत.
--------
ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : तालुक्यातील बहुतांश गावांत रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी गावकऱ्यांना गुरुवारी स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले.
----