हळद खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:20+5:302021-03-01T04:48:20+5:30
शिरपूर जैन : हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या शिरपूर व परिसरात अधिक आहे. मात्र, हळद खरेदी व विक्री व्यवहारासाठी परिसरात ...
शिरपूर जैन : हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या शिरपूर व परिसरात अधिक आहे. मात्र, हळद खरेदी व विक्री व्यवहारासाठी परिसरात बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
नानाविध प्रयोग करत परिसरातील शेतकरी शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गतवर्षी शिरपूर परिसरात चार हजार एकरावर हळद उत्पादन झाले. मात्र, येथे हळद खरेदी करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिरपूर येथील हळद उत्पादक शेतकऱ्यांना हिंगोलीसारख्या शहरात हळद विक्रीसाठी न्यावी लागते. गावामध्ये दोन-तीन हळदीचे व्यापारी आहेत. मे-जून २०२०मध्ये शिरपूर येथे किमान १,५००हून अधिक शेतकऱ्यांनी हळद लागवड केली होती. यामुळे परिसरात लाखो क्विंटल हळदीचे उत्पादन होणार आहे. सध्या काढणीचे काम जोरात सुरू आहे. लवकरच नवीन हळद विक्रीसाठी तयार होत आहे. ही हळद खरेदी करण्यासाठी उपबाजारात योग्य सोय नसल्याने व्यापारी सोयीनुसार उपबाजाराबाहेर हळद खरेदी करतात.