प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांची उणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:09+5:302021-03-07T04:38:09+5:30
आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५३ उपकेंद्र, ६ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, ९ आयुर्वेदिक दवाखाने, ...
आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५३ उपकेंद्र, ६ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, ९ आयुर्वेदिक दवाखाने, १ अॅलोपॅथी दवाखाना आणि १ जि. प. प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहे. नमूद दवाखान्यांमध्ये रुग्णसेवा देण्याकरिता केवळ २७ कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत. नियमित बीएएमएस डॉक्टरांची संख्या केवळ ४ असून बंधपत्रिक एमबीबीएस १, कंत्राटी एमबीबीएस ७ आणि कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांची संख्या १६ आहे. तथापि, मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या पदांमुळे रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत असून रुग्णांची गैरसोय होत आहे.
...................
२५
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र
२७
एमबीबीएस डॉक्टरांची पदे
२७
रिक्त पदांची संख्या
..............
उपकेंद्र बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली
जिल्ह्यात १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत. त्याठिकाणी एकही एमबीबीएस डॉक्टर कार्यरत नसून १०० सीएचओंना (समुदाय आरोग्य अधिकारी) नियुक्ती देण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेतून कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आलेल्या या पदांचा विशेष लाभ होताना दिसत नाही. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जवळ असलेल्या उपकेंद्रांना तर कंत्राटी बीएएमएस डॉक्टरही पुरविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
..............
कोट :
जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रुग्णसेवा दिली जाते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टर्स कार्यरत आहेत. याशिवाय काही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आली असून दर्जेदार सुविधा पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम