आशासेविकांना सुरक्षा किटचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:40+5:302021-05-11T04:43:40+5:30
०००० शासकीय कार्यालये बंद! वाशिम : आरोग्य, नगर परिषद, ग्रामपंचायत, महावितरण, पाणीपुरवठा, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन यासह अत्यावश्यक सेवेशी व ...
००००
शासकीय कार्यालये बंद!
वाशिम : आरोग्य, नगर परिषद, ग्रामपंचायत, महावितरण, पाणीपुरवठा, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन यासह अत्यावश्यक सेवेशी व उपाययोजनांच्या अंमलबजावणीशी निगडित कार्यालये वगळता उर्वरित सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये सोमवार, १० मे रोजी बंद होती.
०००००
घरोघरी फिरून ग्रामस्थांची तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे सोमवारी २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या तपासणीवर भर दिला असून, आरोग्यवर्धिनी केंद्राचे पथक गावात फिरून सर्वेक्षण व तपासणी करीत आहे.
००००००
वीज बिल माफ करण्याची मागणी
वाशिम : कोरोनाकाळात यंदा मार्च ते मे महिन्यातील वीज देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी सोमवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
०००००