रेती अभावी शौचालय बांधकामे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:30+5:302021-07-23T04:25:30+5:30
वाहतूक नियमनाचे प्रश्न झाला गंभीर वाशिम : शहरातील पाटणी चाैक, शिवाजी चाैक, पुसद नाका, हिंगोली नाका आदी ठिकाणी दिवसभरातून ...
वाहतूक नियमनाचे प्रश्न झाला गंभीर
वाशिम : शहरातील पाटणी चाैक, शिवाजी चाैक, पुसद नाका, हिंगोली नाका आदी ठिकाणी दिवसभरातून अनेक वेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून येत आहे.
वाशिम शहर होतेय कोरोनामुक्त
वाशिम : शहरात दैनंदिन कोरोना संसर्गाने बाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांत परिणामकारक घट झालेली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात शहरात केवळ एक रुग्ण आढळून आला. यावरून शहर हळूहळू कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
वृक्ष लागवडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट ठाण मांडून आहे. यामुळे अधिकांश शासकीय उपक्रम ठप्प असून वृक्ष लागवडीकडे ही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सामाजिक वनीकरण विभागानेही याबाबत उदासीनता बाळगली आहे.
गावांतील विजेचा प्रश्न मिटणार
वाशिम : केशवनगर येथील विद्युत उपकेंद्र नजिक ३.२५ मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून सात गावांमधील विजेचा प्रश्न निकाली निघणार आहे.