मुख्य मार्गावर पथदिव्यांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:19+5:302021-09-16T04:52:19+5:30
................... ‘ॲक्टिव्ह’चा आकडा केवळ आठवर वाशिम : आरोग्य विभागाकडून बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. ...
...................
‘ॲक्टिव्ह’चा आकडा केवळ आठवर
वाशिम : आरोग्य विभागाकडून बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. विशेष बाब म्हणजे प्रथमच कोरोनाबाधित असलेल्या ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांचा आकडाही १०च्या खाली उतरून आठ झाला आहे. यामुळे कोरोनाचे संकट बहुतांशी नियंत्रणात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
................
डास प्रतिबंधक धूर फवारणीकडे लक्ष पुरवा
वाशिम : शहरातील पंचशीलनगर, अल्लडा प्लाॅट यासह गवळीपुरा, खाटीकपुरा, बागवानपुरा आदी भागात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्थानिक नगर परिषदेने याकडे लक्ष पुरवून डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी, अशी मागणी मो. समीर यांनी मंगळवारी केली.
..............
वातावरणात बदल, आजार बळावले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम राहण्यासह अधूनमधून पाऊस कोसळत आहे. सकाळच्या सुमारास कधीकधी कडक उन्ह पडत आहे. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गजन्य आजार बळावले असून, नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. विशेषत: सर्दी, ताप, खोकला आदी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
...................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी पूर्णत: संपलेले नाही. असे असताना विशेषत: खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांकडून ना तोंडाला मास्क लावले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
.............
रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी
वाशिम : शहरातील अनेक ठिकाणच्या प्रमुख मार्गांवर रस्ता दुभाजकाची सोय नाही. यामुळे मन मानेल त्या पद्धतीने वाहने चालविण्यात येत आहेत. परिणामी, दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. नगर परिषदेने दुभाजक उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अविनाश इढोळे यांनी केली.
..............
खासगीकरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध
वाशिम : पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांचे खासगीकरण करण्याची जोरदार हालचाल शासनस्तरावर सुरू आहे. यामुळे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात सापडली असून, या निर्णयास कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलन करावे लागेन, असा इशाराही काही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.
..............
रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्याच्या लघुसिंचन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे धरणांच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी रब्बी हंगामात यामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष पुरवून रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी जोर धरत आहे.