वाशिम आगारात एसटी तिकीट मशिनचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 04:32 PM2019-10-06T16:32:04+5:302019-10-06T16:32:10+5:30
वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या वाशिम आगारात इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सचा तुटवडा असल्याने दररोज अनेक फेºया रद्द होत आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. या प्रकारामुळे वाशिम आगाराचे दररोज नुकसान होत असून चालक-वाहकांना मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे.
वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे. पण मागील अनेक महिन्यापासून या मशिन बिघडल्याने वाहकांना कामावर जाता येत नाही. सुमारे ६० ते ६५ मशीन दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याचे वाहकांचे म्हणणे आहे. त्या अद्याप दुरुस्त होवून आल्या नाहीत. त्यातील ५ ते १० मशीन परत येतात. पण त्याही नादुरुस्त असतात. या स्थितीमुळे वाशिम आगारातील बसफेºया मंदावल्या आहेत. त्यामुळे दररोज १ हजार ते बाराशे कि.मी. प्रवास फेºयामुळे रोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची वाहकांमध्ये चर्चा आहे. अनेकांना काम मिळत नसल्याने त्यांचे पगारावर फरक पडत असल्याची माहिती आहे. या स्थितीमुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेक मार्गावरील बसेस रद्द झाल्याने बाहेरच्या आगारांना उत्पन्न मिळत आहे. तसेच प्रवाशांना खाजगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे. या महिन्यात निवडणूक असून दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने महामंडळाने तिकीट मशिन्सच्या तुटवड्यावर मार्ग काढणे आवश्यक ठरत आहे.
वाशिम आगारात इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सचा तुटवडा असून यासाठी वरिष्ठांकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. अनेक मशिन्स नादुरुस्त होत असल्याने तुटवडा जाणवत आहे. आगामी निवडणूक व दिवाळीतील प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस फेºया नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- विनोद इलामे,
आगारप्रमुख, वाशिम