सार्वत्रिक पावसाचा अभाव; प्रमाण मात्र सरासरीच्या दीडपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:16+5:302021-06-30T04:26:16+5:30
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, ...
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ७८४.०, मंगरूळपीर तालुक्यात ७३१.८, मानोरा तालुक्यात ७१३.९, कारंजा तालुक्यात ७२२.६, मिमी पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी जिल्ह्यात १ ते २९ जूनदरम्यानच्या कालावधित २३९.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. हे प्रमाण सरासरीच्या १४८.५ टक्के होते. यंदा याच कालावधित २३४.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण १४५.८ टक्के आहे. यंदाही जून महिन्यात पावसाची सरासरी दीडपट आणि प्रत्येकच तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पिके डौलदार असणे अपेक्षित आहे; परंतु पावसाचे प्रमाण सार्वत्रिक आणि सारखे नसल्याने या पावसाचा पिकांना म्हणावा तेवढा फायदा झालेला नाही.
---
कारंजा, वाशिमचे प्रमाण कमी
जिल्ह्यात जूनमधील पावसाचे प्रमाण २३४.६ मिमी आणि सरासरी १४५.८ टक्के असले तरी कारंजा आणि वाशिम तालुक्यात इतर चार तालुक्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात १०५.९ मिमी, तर वाशिम तालुक्यात १०५.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
----
मंगरूळपीरची स्थिती उत्तम
जिल्ह्यात जून महिन्यात मंगरूळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाचे प्रमाण उत्तम राहिले आहे. मंगरूळपीर तालुक्यात सरासरीच्या २२२.९ टक्के पाऊस पडला आहे, तीर मानोरा तालुक्यात २०८.९ टक्के पाऊस पडला आहे. त्या खालोखाल रिसोड तालुक्यात १४४.९ टक्के, तर मालेगाव तालुक्यात १५२.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
---
पावसाचे तालुकानिहाय प्रमाण
तालुका - पाऊस (मिमी) - टक्के
वाशिम - २०८.३ - १०५.५
रिसोड - २३२.२ - १४४.९
मालेगाव - २३६.० - १५२.३
मं.पीर - २९८.३ - २२२.९
मानोरा २९९.३ - २०८.७
कारंजा १६०.९ - १०५.९
---------------------------