ग्रामीण भागातील चावड्यांवर रंगतोय मोबाइलमधील ‘लुडो  गेम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:12 AM2017-09-21T01:12:29+5:302017-09-21T01:13:12+5:30

आसेगाव पो.स्टे.: ‘प्ले स्टोअर’मधील विविध स्वरूपातील  ‘अँप्स’सोबतच ‘गेम’ने सर्वांनाच अक्षरश: वेड लावले आहे.  त्यातच कागदावरील सापसिडीसोबत खेळला जाणारा ‘लुडो  गेम’ देखील आता मोबाइलवर अवतरला असून, शहरांसह  ग्रामीण भागातील चावड्यांवरही हा गेम मोठय़ा मजेने खेळला  जात असल्याचे दिसून येत आहे; मात्र केवळ मनोरंजनापुरता  तो सिमीत राहिला नसून त्यात आता पैशांची  देवाणघेवाणदेखील होत असून, जिंकण्याच्या स्पर्धेत युवा िपढीचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

'Lado Gaming' in mobile phones in rural areas! | ग्रामीण भागातील चावड्यांवर रंगतोय मोबाइलमधील ‘लुडो  गेम’!

ग्रामीण भागातील चावड्यांवर रंगतोय मोबाइलमधील ‘लुडो  गेम’!

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणाईमध्ये आकर्षण पैसेही लावले जातात!

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे.: ‘प्ले स्टोअर’मधील विविध स्वरूपातील  ‘अँप्स’सोबतच ‘गेम’ने सर्वांनाच अक्षरश: वेड लावले आहे.  त्यातच कागदावरील सापसिडीसोबत खेळला जाणारा ‘लुडो  गेम’ देखील आता मोबाइलवर अवतरला असून, शहरांसह  ग्रामीण भागातील चावड्यांवरही हा गेम मोठय़ा मजेने खेळला  जात असल्याचे दिसून येत आहे; मात्र केवळ मनोरंजनापुरता  तो सिमीत राहिला नसून त्यात आता पैशांची  देवाणघेवाणदेखील होत असून, जिंकण्याच्या स्पर्धेत युवा िपढीचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 
पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात अस्सल मैदानी खेळ  खेळल्या जायचे. त्यात कबड्डी, खो-खो, लगोरी, धप्पाकुट्टी,  कुरघोडी, झाडावरील डाबडाब अशा काही खेळांचा समावेश  होता. सध्या मात्र परिस्थिती बदलली असून, मैदानी खेळांची  जागा मोबाइल खेळांनी घेतल्याचे दिसून येत आहे. आजमि तीस बहुतेकांकडे स्मार्टफोन आहे; परंतु त्याचा उपयोग  चांगल्या कामांसाठी होण्याऐवजी दुरुपयोग अधिक होताना  दिसत आहे. स्मार्टफोनमधील करमणुकीचे खेळ आता  पैशांवरही खेळले जात आहेत. हल्ली सर्वांच्या परिचयाचा  असलेला लुडो किंग हा गेम स्मार्टफोन असणार्‍या सर्वांकडे  असून, तो खेळण्यासाठी दोन ते चार लोकांची आवश्यकता  असते. बेरोजगार युवक आपल्या सहकार्‍यांसमवेत शाळा,  कॉलेज, हॉटेल, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी,  शासकीय कार्यालयांमध्ये खेळत आहेत. या गेमने शहरासह  ग्रामीण भागातही हल्ली धुमाकूळ घातला आहे. तरूणांसह  लहान मुले, अबालवृद्ध व सुशिक्षित युवक लुडो गेमच्या  मोहात अडकले आहेत.

Web Title: 'Lado Gaming' in mobile phones in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.