अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 04:05 PM2019-08-11T16:05:43+5:302019-08-11T16:05:54+5:30

तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला.

Lakhs of funds collected in just three hours! | अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी!

अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : महापुरामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून अनेकांचा निवारा हिरावला गेला. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना विविध स्वरूपातील मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला असून शिरपूरमध्येही ११ आॅगस्टला व्यापाºयांकडून रॅली काढण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अवघ्या तीन तासात लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव, उपाध्यक्ष सलीम गवळी, वैभव विश्वंभर, विठ्ठल काळे, प्रशांत क्षीरसागर, शकील पठाण, राहुल मनाटकर, गोपाल जाधव, दिनेश मुथा, भिकुलाल डुखवाल, गोपाल वाढे, ओंकार देवकर, रामेश्वर डुखवाल यांच्यासह प्रशांत देशमुख, शेख सुलतान, कैलास भालेराव, राजू बुकसेटवार, अमित वाघमारे, अमोल भालेराव, सुनील गाभणे, शरद दायमा आदिंनी पुढाकार घेऊन रविवारपासून पाच दिवस मदतनिधी गोळा करण्याचा निर्धार केला.   याअंतर्गत पहिल्याच दिवशी एक लाखांपेक्षा अधिक मदतनिधी गोळा करण्यात आला असून, अंतीमत: किमान दोन तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला. 
 
भिक्षा मागून गोळा झालेल्या पैशातून फकीरानेही केली मदत
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी गोळा करण्याचे कार्य सुरू असल्याचे एका फकिराला दिसून आले. यावेळी त्याने स्वत:साठी मागितलेल्या भिक्षेतून जमा झालेले पैसे मदतनिधीच्या बॉक्समध्ये टाकून माणूसकीचा प्रत्यय दिला.

Web Title: Lakhs of funds collected in just three hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.