लाखो क्विंटल तूर घरातच पडून!

By admin | Published: July 17, 2017 02:43 AM2017-07-17T02:43:58+5:302017-07-17T02:43:58+5:30

रिसोड: नाफेडकडून तूर खरेदी बंद झाली, तेव्हापासून लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. हमीदराने ती विकत घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे.

Lakhs of quintal toilets fall into the house! | लाखो क्विंटल तूर घरातच पडून!

लाखो क्विंटल तूर घरातच पडून!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: नाफेडकडून तूर खरेदी बंद झाली, तेव्हापासून लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. हमीदराने ती विकत घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे.
तुरीला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मे महिन्यात नाफेड केंद्रावर तूर खरेदीसाठी नेली होती. ३० मेपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे अपेक्षित होते; मात्र शेकडो शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी झाली नाही. परिणामी हजारो क्विंटल तूर मोजणीविना पडून आहे. खासगी बाजारात तुरीला हमीभाव नसल्याने आणि टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांना तुरीची खरेदी होण्याची हमी नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

Web Title: Lakhs of quintal toilets fall into the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.