लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्रच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:53+5:302021-02-23T05:01:53+5:30

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र ...

Lalpari insecure, fire extinguisher disappears | लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्रच गायब

लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्रच गायब

googlenewsNext

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र खिळखिळ्या झालेल्या बसेस, सोयीसुविधांच्या अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रेही बेपत्ता झाली असल्याचे रविवारी मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम बसस्थानकावर उभ्या असलेल्या काही बसगाड्यांची पाहणी केल्यानंतर आढळून आले.

१) या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नाही ! (बॉक्स)

१-हैदराबाद-अकोला (एमएच४०/एजी६४६२)

२-अकोला-पाथरी (एमएच२०/बीएल ३५३५)

३-वाशिम- औरंगाबाद (एमएच४०/एन ९५४०)

४- रिसोड-वाशिम-रिसोड (एमएच४०/बीएल ८८३९)

-----------

२) प्रथमोपचार पेट्याही गायब

जिल्ह्यातून धावणाऱ्या स्थानिक आगाराच्या एसटी बसेसह बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी आढळून आली नाही. काही बसमध्ये प्रथमोपचार पेट्या आढळून आल्या, मात्र त्या प्रथमोपचार पेट्यात औषधीच नसल्याचे पाहणीतून आढळून आले. यामुळे एखाद्यावेळी अपघात घडून प्रवाशांना दुखापत झाल्यास त्यांच्यावर तातडीचे प्रथमोपचार होणे अशक्य असल्यानेही त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

------------

३) वायफाय नावालाच

एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन व्हावे. त्यांना मोफत इंटरनेट सुविधा मिळावी म्हणून तीन वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली. यासाठी एसटी महामंडळाने मोठा खर्चही केला; परंतु अगदी सुरुवातीपासूनच त्याचा फारसा फायदा प्रवाशांना झाला नाहीच उलट वर्षभराच्या आतच ही सुविधा बंद पडली. बहुतांश बसेसमध्ये, तर वायफायचे बॉक्सही दिसत नाहीत. मनोरंजन बंद झाल्याने प्रवाशांतून नाराजीचा सूर निघत आहे.

--------------

४) आगारात चौकशी करूनच प्रवेश

जिल्ह्यातील कारंजा आगार वगळता रिसोड, मंगरुळपीर आणि वाशिम येथील आगार बसस्थानक लगतच आहेत. त्यामुळे नादुरुस्त बसगाड्या तातडीने तेथे नेल्या जातात. या ठिकाणी आगाराचे कर्मचारी किंवा चालक, वाहकांशिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश बंदी असून, यासाठी आगाराच्या फाटकावरच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे चौकशी करूनच प्रत्येकाला आत प्रवेश करू देतात.

------------

६) बसस्थानक परिसरात सर्रास सिगारेटचे झुरके

बसस्थानक परिसरात एसटी बसगाड्यांच्या बाजूला काही मंडळी सिगारेट, विडीचे झुरके घेताना दिसतात. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब घातक आहेच शिवाय सिगारेट किंवा विडी ओढल्यानंतर त्यांचे थुटके मोकळ्या जागेत फेकून दिले जातात. एखाद्यावेळी काडी कचरा पेटून आगीच्या ठिणग्या उडाल्यास परिसरात उभ्या असलेल्या एसटी बसलाही धोका संभवतो.

---------

७) आगारप्रमुख किंवा बसस्थानक प्रमुखांचा कोट

कोट: आमच्या आगारातील प्रत्येकच एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्र ठेवण्यात आले आहे. एखाद्या एसटीबसमध्ये प्रथम दर्शनी ते आढळले नसेल. प्रथमोपचार पेट्या मात्र काही एसटी बसेसमध्ये नाहीत, तर वायफाय सुविधा वरच्या स्तरावरूनच बंद पडलेली आहे. त्यामुळे या संदर्भात आपणास काही सांगता येणार नाही.

-विनोद इलामे,

आगारप्रमुख, वाशिम

---------

Web Title: Lalpari insecure, fire extinguisher disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.