पर्समधील सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:54+5:302021-08-18T04:48:54+5:30
प्राप्त माहितीनुसार लताबाई मदन खोडके(४५) रा.शेगाव खोडके ता. सेनगाव जि . हिंगोली यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवार १७ ऑगस्ट ...
प्राप्त माहितीनुसार लताबाई मदन खोडके(४५) रा.शेगाव खोडके ता. सेनगाव जि . हिंगोली यांनी पोलिसात दिलेल्या
फिर्यादीवरून मंगळवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजताच्यादरम्यान फिर्यादीने पती आणि, पुतण्यासोबत दागिन्याच्या दुकानात जाऊन २ ग्रॅम वजनाचे ७ हजार ११० रुपये किमतीचे सोन्याचे दोन डोरले खरेदी केले. नंतर एका दागिन्याच्या दुकानालगत पोत गाठण्यासाठी गेली, तर त्यांचे पती बाजूला चहा पिण्यासाठी गेले. फिर्यादी गळ्यातील मंगळसूत्र सोडत असताना मंगळसूत्र तुटून खाली पडले. त्यामुळे त्यातील मणीही रस्त्यावर पडले. ते मणी वेचत असताना तेथे एका अनोळखी महिलेने फिर्यादीला मणी वेचण्यास मदत केली. थोड्या वेळाने फिर्यादीने स्वत:कडील पर्स पाहिली असता त्यामधील झुमके, वेल व गहूमणी ठेवलेली डबी दिसली नाही. फिर्यादीच्या अवतीभवती असलेल्या त्या महिलेनेच १२ ग्रॅम वजनाचे ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी महिलेवर कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.