महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्यावर आक्षेप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:45 PM2019-05-14T15:45:53+5:302019-05-14T15:47:24+5:30
एकूण ३२ गावांपैकी १२ गावांतून ३५ हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात एनएच-१६१ या राष्टÑीय महामार्गासाठी मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमिन संपादित करण्यात आली. आता या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत असताना जमिनीच्या हक्कासह इतर काहीबाबतीत हरकती व आक्षेप दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाला या प्रकरणांच्या सुनावणीत न्यायनिवाडा करूनच शेतकºयांना मोबदला वितरीत करता येणार आहे. एकूण ३२ गावांपैकी १२ गावांतून ३५ हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या एनएच-१६१ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील शेतकºयांच्या २५१ हेक्टर जमिन संपादनाचे काम महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाने सुरुवातीला शेतकºयांच्या जमिनीबाबत हरकती, दावे मागितले, तसेच जमिनीशी संबंधित सर्वच व्यक्तींचे जबाबही नोंदवून घेतले. त्यामुळे भुसंपादन प्रक्रिया पार पडली आणि जमिनीच्या मुल्यांकनानुसार मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या भुसंपादनाच्या मोबदल्यात शेतकºयांना ३४६ कोटीचे वितरण करावे लागणार असून,आजवर १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. तथापि, शेतकºयांना जमिनीचा मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विविध गावांतून या प्रक्रियेबाबत हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आले आहेत.
आधीच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसह इतर तांत्रिक कारणांमुळेही यात खोळंबा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकºयात निराशेचे वातावरण होते. आता मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरळीत होत असताना आक्षेप आणि हरकती दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आक्षेपाचे स्वरूप वेगवेगळे
राष्ट्रीय महामार्ग एनएच-१६१ साठी करण्यात आलेल्या भुसंपादनानंतर मोबदला देण्याबाबत दाखल हरकती आणि आक्षेपांचे स्वरुप वेगवेगळे आहे. त्यात काही जमिनींचे प्रकरण न्याय प्रविष्ट असणे, ताबा आणि वहिवाटीत फरक असणे, गट व नकाशात फरक असणे आदिंसह काही प्रकरणांत घरगुती वाद असल्याने जमिनीचा मोबदला अदा करण्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. आता या सर्व प्रकरणांवर उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयात सुनावणी होऊन न्यायनिवाडा झाल्यानंतरच मोबदला अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून, यात न्याय निवाडा न झाल्यास प्रकरण न्यायालयातही दाखल करता येणार आहे.
मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील ३२ गावात एनएच-१६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. आता या जमिनीचा मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू असताना १२ गावातून विविध प्रकारचे आक्षेप आणि हरकती दाखल करून मोबदल्यावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सुनावणीनंतरच मोबदला देण्याचा निर्णय होणार आहे.
- प्रकाश राऊत
उपविभागीय अधिकारी, वाशिम