चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:27 AM2017-08-03T01:27:20+5:302017-08-03T01:28:36+5:30

वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय  महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्हय़ातील ९७  किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार  आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ ऑगस्ट रोजी जारी  झाले असून, संबंधित शेतकर्‍यांना २१ ऑगस्टपर्यंत उ पविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम  यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत. 

Land acquisition process for four-laning! | चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!

चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!

Next
ठळक मुद्देअकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग भारत सरकारचे राजपत्र १ ऑगस्ट रोजी जारी२१ ऑगस्टपर्यंत स्वीकारले जातील आक्षेप!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय  महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्हय़ातील ९७  किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार  आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ ऑगस्ट रोजी जारी  झाले असून, संबंधित शेतकर्‍यांना २१ ऑगस्टपर्यंत उ पविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम  यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत. 
अकोला ते हैदराबाद या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा  दर्जा मिळाल्यानंतर रस्ता रूंदीकरण, चौपदरीकरणाच्या  कामाला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी रस्त्यालगतची  जमीन संपादन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.  अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मेडशी गावा पासून ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या राजगाव  या दरम्यानच्या गावातील शेतकर्‍यांची रस्त्यालगतची जमीन  संपादीत केली जाणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या रस्ते  वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाने राजपत्र जारी केले असून,  कोणत्या गावातील किती शेतकर्‍यांची जमीन संपादीत केली  जाणार आहे, याबाबतचा लेखाजोखा जाहीर केला आहे.  सदर जमिनीच्या संदर्भात जमीन मालक किंवा जमिनीशी हि तसंबंध असणार्‍या व्यक्तिला काही शंका किंवा आक्षेप  असेल तर २१ ऑगस्टपर्यंत वाशिम येथील उपविभागीय  अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात हरकत किंवा आक्षेप  नोंदविता येणार आहेत. 
प्रत्येक शेतकर्‍यास आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात  येणार आहे. तथापि, सर्व हरकती ऐकून घेतल्यानंतर आणि  काही प्रकरणात चौकशी आवश्यक असल्यास सक्षम  प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल. चौकशीअंती हरक ती स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा आदेश जारी  करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देण्यात आले आहे त. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला आदेश हा अंतिम  राहणार आहे. हरकती व आक्षेपांचे निरासरण केल्यानंतर  शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या महामार्गालगतच्या  जमिनीचे संपादन केले जाणार आहे. भूसंपादनानंतर पुढील  कार्यवाही केली जाणार आहे. 

या गावांतील जमिनीचे होणार संपादन 
अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तथा वाशिम  जिल्हा हद्दीतील मेडशी, रिधोरा, सुकांडा, इरळा, डही,  नागरतास, मालेगाव, कोल्ही, अमानी, झोडगा खुर्द, झोडगा  बु., चिवरा, सावरगाव बरडे, जांभरूण परांडे, सोनखास,  जांभरूण नावजी, गोंदेश्‍वर, जांभरूण भित्ते, अंजनखेड,  धुमका, राजगाव आदी गावांतील रस्त्यालगतच्या जमिनीचे  संपादन केले जाणार आहे. 

अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी  भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित  शेतकर्‍यांना काही आक्षेप किंवा हरकती नोंदविता येणार  आहेत. कुणाला काही आक्षेप असल्यास उपविभागीय  अधिकारी कार्यालय वाशिम येथे लेखी स्वरुपात हरकती  नोंदवाव्यात.
- अभिषेक देशमुख,
उपविभागीय अधिकारी, वाशिम.
 

Web Title: Land acquisition process for four-laning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.