समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाईची मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:16+5:302021-06-16T04:53:16+5:30

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग बांधकामात पर्यावरणाचे, तसेच समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या गावाच्या जंगल, शेतशिवार, भौगोलिक क्षेत्राचे मोठे नुकसान ...

Land loss due to construction of Samrudhi Highway; Demand for compensation! | समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाईची मागणी !

समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाईची मागणी !

Next

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग बांधकामात पर्यावरणाचे, तसेच समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या गावाच्या जंगल, शेतशिवार, भौगोलिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आवश्यकता नसलेल्या असंख्य पुरातन वृक्षाची तोड झाली. असंख्य प्रमाणामध्ये जलस्रोत बाधित करण्यात आले. नदी, नाले, ओढे बांधकामाकरिता केलेल्या पक्क्या आणि कच्चा रस्त्यांच्या बांधणीमुळे जलस्रोत बाधित झाले आहे. प्रवाह बदलले आहे. यामुळे शेतजमिनीतील मृदता नष्ट झाली आहे. ११ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसाने शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटना समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केली.

.....

बॉक्स

अशा आहेत मागण्या

जंगल क्षेत्रात नुकसानाची पूर्तता करण्यासाठी क्षतिपूरक वनीकरण कोष प्रबंधन एवं योजना प्राधिकरण अधिनियमनुसार दहाही गावांना प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये द्यावेत.

जंगल क्षेत्र व गाव शिवाराचा सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने परिस्थितीकी शास्त्रज्ञ व जैवविविधता शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा अभ्यास गट गठीत करावा.

गाव हद्दीमध्ये करावयाची सर्व पर्यावरणीय कामे ग्रामसभेच्या सहमतीनेच करावीत.

बाधित झालेले सर्व जलस्रोत तत्काळ पुनरुज्जीवित करून प्रवाह कायम करावे, बाधित झालेले पांदण रस्ते, पायवाटा, शेतरस्ते मोकळे करावेत.

ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

Web Title: Land loss due to construction of Samrudhi Highway; Demand for compensation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.